शिकवण्याच्या पलीकडे: वर्गातील न दिसणारी विचारप्रक्रिया!
आपण lesson plan तयार करतो. त्यासंदर्भात उद्दिष्टे स्पष्ट, पद्धती ठरलेल्या, अपेक्षित परिणाम निश्चित, हे सर्व आपण व्यवस्थित प्लॅन करून करतोच. दिसायला अगदी सर्व व्यवस्थित दिसतं… पण कागदावर! नाही का?
वर्गात प्रवेश करताच एक वेगळीच वास्तविकता समोर येते. जिथे कोणताही प्लॅन पूर्णपणे पुरेसा ठरत नाही.
एकाच वर्गात एक संकल्पना पटकन समजणारा विद्यार्थी, एक प्रयत्न करत राहणारा सरासरी विद्यार्थी, आणि एक ज्याला अभ्यासात अजिबात रस वाटत नाही… हे तिघेही आपल्याला पाहायला मिळतात. त्यानुसार त्यांचा मिळणार प्रतिसाद वेगळा असतो.
आणि इथेच एक अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहतो. आपण खरंच सगळ्यांना शिकवत आहोत, की फक्त काही जणांपर्यंत पोहोचत आहोत? ३५ ते ४० मिनिटांची एक तासिका आणि प्रति वर्गात ३५ ते ४० विद्यार्थी असतात. वेगवेगळे स्तर, वेगवेगळ्या गरजा. बरोबर?
या सगळ्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला observe करणं, समजून घेणं, हे केवळ कठीण नाही, तर सतत सजग राहण्याची मागणी करतं. Consistency आवश्यक असते… पण प्रत्येक वेळी पूर्णता शक्य नसते.
माझ्या मागच्या लेखात मी एका वर्गातील case study दिला होता. तो आपण पुन्हा इथे नव्याने पाहुयात.
कविता शिकवताना काही विद्यार्थी लगेच प्रतिसाद देत होते. काही शांत होते. आणि काही २-३ विद्यार्थी पूर्णपणे disengaged वाटत होते.
पहिल्या क्षणी वाटलं, तो शिकत नाही. पण थोडं लक्ष दिल्यावर जाणवलं, तो वर्गात असूनही वेगळ्या पद्धतीने उपस्थित होता. त्या क्षणी lesson plan अपुरा पडला आणि निरीक्षण महत्त्वाचं ठरलं.
जेव्हा प्रश्न बदलतात तेव्हा संदर्भ सुद्धा बदलतात. आणि त्याच वेळी प्रतिसादही बदलायला लागतो.
इथे एक सूक्ष्म जाणीव होते. आपण 'Research' वेगळं करून करत नाही. ते आपण teaching करतानाच ते जगत असतो.
थोडं थिअरोटिकली पाहुयात:
Theory मध्ये आपण तीन प्रकार शिकतो.
Qualitative, Quantitative आणि Mixed research.
पण हे प्रकार केवळ definitions नाहीत. ते आपल्या समजण्याच्या पद्धती आहेत.
Qualitative Research (गुणात्मक संशोधन)
हे अनुभव, भावना आणि वर्तन समजून घेण्यावर आधारित असतं.
उदाहरण, एखादा विद्यार्थी शांत आहे.
-> का? त्याला भीती वाटते का? त्याचा आत्मविश्वास कमी आहे का?
त्याच्याशी संवाद साधणं, त्याचं निरीक्षण करणं - हे गुणात्मक आहे.
इथे आकडे नसतात… पण अर्थ असतो.
Quantitative Research (परिमाणात्मक संशोधन)
हे आकडे, मोजमाप आणि डेटावर आधारित असतं.
Marks, test scores, attendace - हे आपल्याला स्पष्ट चित्र देतात.
इथे स्पष्टता असते… पण पूर्ण गोष्ट नसते.
Mixed Research (मिश्र संशोधन)
जेव्हा आपण दोन्ही एकत्र वापरतो. विद्यार्थ्याचे marks कमी आहेत (Quantitative), आणि त्यामागचं कारण समजून घेतो (Qualitative), तेव्हा आपण अधिक योग्य निर्णय घेऊ शकतो.
आणि इथेच खरा समतोल निर्माण होतो.
पण या सगळ्या प्रक्रियेला मर्यादा आहेत. वेळ कमी असतो, विद्यार्थी जास्त असतात, आणि प्रत्येकाची क्षमता वेगळी असते.
मग प्रश्न असा नाही की आपण perfect कसं व्हायचं?
तर असा आहे की, या मर्यादांमध्ये आपण अधिक सजग कसं राहू शकतो?
कदाचित उत्तर छोटे छोटे बदल असू शकतात! आपण जे पाहतो ते पूर्ण सत्य नसतं… ते फक्त सुरुवात असते.
जसे कि,
थोडं जास्त observe करणं…
थोडं कमी judge करणं…
आणि lesson plan पेक्षा connection ला जास्त महत्त्व देणं.
ह्यासंदर्भातील विचार अनेक शिक्षणतज्ज्ञांनी मांडले आहेत. त्यांच्यापैकीच एक John Dewey यांचे शब्द इथे अर्थपूर्ण वाटतात:
“If we teach today as we taught yesterday, we rob our children of tomorrow.”
Teaching ही पुनरावृत्ती नाही… ती सतत बदलणारी प्रक्रिया आहे.
शेवटी एकच जाणवतं...
वर्ग ही फक्त शिकवण्याची जागा नाही… ती समजून घेण्याची, बदलण्याची आणि पुन्हा विचार करण्याची जागा आहे. आणि कदाचित, आपण शिक्षक म्हणून जे दररोज करतो, ते म्हणजेच संशोधन.
शिकवणं म्हणजे उत्तरं देणं नाही… तर शोधायला शिकवणं आहे. स्वतः शोधन करून त्यातून नवनिर्मितीकडे जाणे म्हणजेच संशोधन. अगदी सोपी व्याख्या आहे ही आणि त्याहून सुंदर त्याचा गाभा!
कदाचित, तिथेच शिकवणं केवळ शिकवणं राहत नाही… त्यापेक्षा काहीतरी अधिक बनतं!
And maybe… that is where real learning begins.
- अनुप्रिया सावंत
No comments:
Post a Comment
Thank You For Sharing Your Valuable Feedback.